प्रतिनिधी , नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्टयात म्हणजे ननाशी परिसरात भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतू यावर्षी आता ४ – ५ दिवसापासुन जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे भाताच्या आवणी म्हणजे लागवडीला वेग आला असून भात लागवड साठी मजूर भेटत नसल्याचे भात उत्पादक गणपत भोये यांनी सांगीतले.
