महामार्गावर पाणी साचल्याने कोल्हापूर,कर्नाटक ला जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या..
प्रतिनिधी , सातारा : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे.. कोल्हापूर, सांगली, निपानी येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबई पुण्याकडुन येणारी वाहने साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका खंडाळा कराड येथे प्रशासनाकडून अडवण्यात आली आहेत.
आनेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनांची संख्या 200च्या आसपास असून मालवाहतूक तसेच खासगी वाहन चालकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.. राज्य वाहतुक संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी आणि भुईंज पोलिसांनी अडकलेल्या वाहन चालकांना फूड पॅकेट वाटप केले..
सातारा जिल्ह्यात महामार्गावर अडकून राहिलेल्या प्रवाश्यांना जिल्यातील संस्थांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
