प्रतिनिधी , अहमदनगर : समाजकारण करत राजकारणात नव्या पिढीने सक्रिय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण प्रदूषण आयुक्त दिलीप जी खेडकर यांनी व्यक्त केले परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या धार्मिक अध्यात्मिक संस्थांनवर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेऊन गावागावातील लोकांना वृक्षारोपणाचे महत्त्व विषद करण्याचं काम परिवर्तन प्रतिष्ठानचे सदस्य करत आहेत मुंगूसवाडे येथील दशनाम पीठ हनुमान मंदिर येथे १०१ फळ वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ह भ प संतोष शुक्ल भारती महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करण्यात आली.
