जनतेज न्युज

बोदवड च्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

प्रतिनिधी , जळगाव : बोदवड तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज बोदवड शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी नागरिकांच्या विविध समस्या पालकमंत्र्यांनी सोडवल्या
बोदवड तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आज बोदवड येथे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्यातील नागरिकही उपस्थित होते नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर वाचला, या नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर झाले नागरिकांचे कामे त्वरित सोडवा अशी तंबी दिली अधिकाऱ्यांना गुलाबराव पाटील यांनी दिली या कार्यक्रमासाठी आमदार चंद्रकांत पाटील ,तहसीलदार ,डी वाय एस पी ,आरोग्य अधिकारी ,पाणी पुरवठा अधिकारी, गट विकास अधिकारी, व भव्य संख्येने नागरिक उपस्थित होते