प्रतिनिधी , नांदेड : किनवट तालुक्यातील इस्लापूर पासुन जवळ असलेला हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय..
सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधब्याच्या एका बाजूने पैनगंगा अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूने असलेल वन विभागाच पर्यटन संकुल अशा या पर्यटन संकुलाने सहस्रकुंड धबधब्याच्या सौंदर्यामध्ये चांगलीच भर टाकलीय..
त्यामुळे वेली फुलांच्या आणि पक्षाच्या किलबीलाटासह पर्यटकाचा आकर्षक ठरलेला आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहताना दिसतोय..
हा सहस्रकुंड धबधबा विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही बाजूने पर्यटकांना पहाता यावा यासाठी पर्यटन मंत्र्यांनी येथे रोपवे बसविण्यासाठी मंजूरी देवून रोपवे बसवण्यात यावे अशी मागणी सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी केलीय….
