जनतेज न्युज

नगर जिल्ह्यात प्रथमच बहरली सफरचंदाची बाग

प्रतिनिधी , अहमदनगर: सफरचंद म्हटलं की काश्मीर हे नाव पुढे आल्याशिवाय रहात नाही कारण ह्या फळाची उत्पादन घेण्याकरिता त्यास लागणारे पोषक हवामान हे त्या राज्यात आहे. परंतु शेती व्यवसायातील असलेली संशोधन प्रगती ही दिवसंदिवस वाढत आहे.त्याची प्रचिती सफरचंद बाग आपल्याकडील वातावरणात फुलऊ शकते. ही परिस्थिती कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील ध्येयवेड्या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवली.
याबाबतीत प्रगतशील शेतकरी सुहास वाबळे हे शेती विषयक परिसवांदआणि मार्गदर्शन करिता राजस्थान राज्यातील जोधपूरजिल्यातील एका गावात सुमारे 43 ते 44 तापमानात सफरचंद ची बाहरलेली बाग दिसली यात प्रत्येक झाडाला 350 ते 400 फळ होती.शेती विषयक आवड असल्याने त्यानीं बाग आणि त्याच्या कलमविषयी माहिती घेतली.
याबाबतीत अधिक माहिती देताना सुहास वाबळे म्हणाले की की महाराष्ट्रातील शेतकरी डाळिंब, चिक्कू, पेरू, द्रांक्षे आदींची बाग लाऊन शाश्वत उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात मात्र या व्यतिरिक्त पीक अथवा फळबाग घेण्याचा प्रयत्न करत नाही त्याचे कारण त्यात यशस्वी होऊ किंवा नाही. परंतु मला शेतीची आवड असल्याने मी पाहिलेली सफरचंद ची बाग आपल्या वातावरण येऊ शकते त्याचा पूर्ण छाडा लावून माहिती घेतली असता सफरचंद चे भारतात हिमाचल मधील सोलन येथे संशोधन केंद्र असून यामध्ये 20 जातींचे सफरचंद ची रोप असून त्यातील सतरा जाती ह्या हाय चिलिंग आहे चिलिंग म्हणजे झाल्यावर बर्फ पडल्याशिवाय फुले बहरत नाही आणि तीन जाती ह्या उष्म हवामाणात देखील फुले बाहरवून फळ येतात. यात हरिमन 99, डोरसेट, आणि गाला यापैकी हरिमन 99 ह्या जातींचे रोप आणून बाग तयार केली.व ती पूर्ण सेंद्रिय खत वापरल्याने पहिल्या दोन सुमारे सुमारे अडीच ते तीन लाखांचे उत्त्पन्न निघेल अशी अपेक्षा वाबळे यांनी व्यक्त केली.