जनतेज न्युज

“तुमच आम्हाले काही घेन नाही”, वयोवृद्ध आई-वडिलांना मारहान करुन काढले घराबाहेर…

प्रतिनिधी , बुलडाणा : ‘ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांची जीणे हराम करणाऱ्या बुलडाण्यातील देऊळगाव माळी येथील एका मोठ्या मुलांने मारहाण करून  घराबाहेर काढले आहे.या घडलेल्या घटनेसंदर्भात वृद्ध दांपत्याने बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तक्रारींचे निवेदन दिले आहे..
बुलडाण्यामधिल देऊळगाव माळी येथील परसराम फलके यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा मोठा मुलगा मारहान करतो मानसिक त्रास देतो ,आम्हाला तुमच काही घेन नाही,आम्हाला मारहान करुन घराबाहेर काढले अशी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे,विशेष म्हणजे विनोद फलके हा गावातील माझी उपसरपंच आहे, त्याने त्यांची नावे असलेली घराची जागा ही स्व:तच्या नावे करुन घेतली व बँकेत ही काही कल्पना न देता कर्ज काढल्याचा आरोप वृद्ध फलके दाम्पत्याने केला आहे,यापूर्वी त्यानी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटुन घटने संदर्भात तक्रार केली होती,मात्र कुठलीच कारवाही न झाल्याने शेवटी त्यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे,आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे…