जनतेज न्युज

राणे साहेबांना मोठा लाडू भेटल्यामुळे त्यांना बोलणं गरजेचे आहे बोलण्याकरताच त्यांना मंत्री केला आहे ना गुलाबराव पाटील.

प्रतिनिधी , जळगाव: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात मुख्यमंत्री नाहीत प्रशासन नाही राज्य चालवता येत नसेल तर केंद्राच्या हातात द्या आम्ही वेटिंग वर आहेत अशी टीका राज्याचे मुख्यमंत्र्यांवर केली होती या टीकेला उत्तर देताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले राणेसाहेबांना मोठा लाडू भेटल्यामुळे त्यांना बोलन गरजेचे आहे बोलण्याकरता त्यांना मंत्री केलेल आहे आणि ही चाबी भरल्याशिवाय ये खेळन चालत नाही.

  • मुख्यमंत्री आले कोरोना व हे संकट राज्यावर आलेत यावर उत्तर देताना ना गुलाबराव पाटील म्हणाले ते मंत्री झाले आणि भरपूर पाऊस पडला कोकणावर असे म्हणायला काय हरकत आहे.