प्रतिनिधी , जळगाव: चोपडा तालुक्यासह परिसरात अवैध धंदे सर्रास सुरू असल्याने हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जि प सदस्य बाळासाहेब पाटील यांनी निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला होता परंतु तालुक्यात अवैध धंदे बंद संदर्भाचे प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात न आल्याने आज तहसील कार्यालयावर अवैध धंदे विरोधात उपोषण सुरू आहे या उपोषणा संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सांगितले व उपोषण मागे घ्या असेही सांगितले परंतु उपोषण सोडवण्यासाठी या ठिकाणी कुठलेही अधिकारी न आल्याने तहसील कार्यालयावर अवैध धंदे विरोधात बाळासाहेब पाटील यांचे उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.
