जनतेज न्युज

शिर्डी-डाळिंबावर तेल्या रोग त्यात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचे गणितच कोलमडलं…..

प्रतिनिधी : राहाता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंब पीक घेतले जाते परंतु गेली दोन वर्षापासून कोरोनाच सावट आणि तेल्या रोग बागेवर पडत असल्याने डाळिंबाचा रंग फीका होत असून डाळींब उलत आहे.आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला पॅकिंग मटेरियल चे दरही वाढले. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडले आहे.हीच व्यथा व्यापारी आणि अडत दारांची झाली आहे. परराज्यात किंवा जिल्हा बाहेर डाळिंब विक्रीचे दर खरेदी दरा एवढेच मिळत आहे.त्यामुळे व्यापाऱ्या सह अडत आणि डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे ….
राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज आठ ते दहा टन डाळिंबाची बाजार समितीत खरेदी-विक्री होत असते शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून लहरी निसर्गाला तोंड देत केलेले अतोनात कष्ट मजुरी औषध फवारणी वाहतूक खर्च याचा मेळ घालणे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला ही परवडत नाही. त्यात तेल्या रोगाने डाळिंब उत्पादकाची उडवलेली दैना वेगळीच आहे..राहाता तालुक्यातील खैरी निमगाव परिसरात संजय लबडे यांनी चार एक्कर क्षेत्रावर डाळिंब बाग बसवली आहे. परंतु दोन वर्षे लॉक डाऊनचे गेल्याने आधीच अडचणीत असलेल्या लबडे यांच्या डाळिंबावर आता तेल्या रोगाने थैमान मांडले आहे… फळ सुकून जात आहे. तपकिरी रंगाचे पडले आहेत काही फळे काळी झाली आहेत तर काही फळ उलत आहे. त्या मुळे डाळींब तोडून फेकून देत आहे शेतकरी…..
चार एक्कर बाग असून प्रत्येकी एक्कर मागे सव्वा लाख रुपये खर्च केला अजून गेली तीन चार वर्षात एकही रुपये नफा मिळाला नाही. गेल्यावर्षी विमा काढला त्याचे कोणतेही पैसे मिळाले नाही घरातले डाग दागिने गहाण ठेवून बागेसाठी खर्च केला रोज तीन ते चार मजुरांकडून काम करून घ्यावे लागते त्यांना रोज पैसे द्यावे लागतात. त्यात आमच्या बागेवर तेल्या रोग आल्याने डाळिंब बाग काढून टाकण्याची वेळ आली आहे…..