वणी रस्त्यावर झालेल्या चिखलात केली भाताची लावणी, अनोख्या पध्दतीने स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन.
प्रतिनिधी , नाशिक: वणी शहरातील देवी मंदिरा कडे जाणा-या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल झाला असुन या भागातील रहिवाश्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्या साठी रस्त्यावरील चिखलात अनोख्या पध्दतीने आंदोलन करीत भाताची लावणी केली.
कसबेवणी काॅलेज ते देवी मंदिराकडे जाणारा रस्त्या असुन या रस्त्यांच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती.या रस्त्या लगत असलेले सर्व छोटेमोठे अतिक्रमण ही काढले रस्त्या मोठा व चांगला होईल या आशेने रहिवाशांकडून सहकार्य करीत अतिक्रमण काढुन घेतले.मागील काही माहीन्या पुर्वी या रस्त्यावर दगड,खडी,टाकण्यात आले होते तेव्हा येण्याजाण्या साठी अडचण झाली होती तसेच या ठिकाणी करण्यात येणा-या रस्त्यांचे काम बंद करण्यात आले.ठेकेदाराकडून खडी दगड तसेच पडून होते .ग्रामस्थांची ओरड झाल्या नंतर या ठिकाणी माती मिश्रीत मुरुम टाकुन दिला होता.पावसाळा सुरु होताच चिखल झाला .याभागातील रहिवाशांकडून वारंवार ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करण्यात आला परंतु काहीच फायदा झाला नाही मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल आहे पायी चालणे मुश्किल झाले .तसेच हा रस्त्या बायपास असल्याने देवीमंदिराकडे जाणा-यांची नेहमीच वर्दळ असते.कांद्यांचे ट्रॅक्टर याच रस्त्यावरुन येजा करत असल्याने अजुन चिखल झाला.अनेक दुचाकीस्वार घसरून पडले,या रस्त्याला लागून असलेल्या रहिवाशांना या समस्यांला तोंड द्यावे लागत आहे.याभागातील रहिवाशी भारती देशमुख ,मीना चौधरी ,कल्पना पाटील ,नाजीमा शेख, पूजा पाटिल, शरद चौधरी, अशोक पाटिल आसिफ शेख यांनी रस्त्यावर एकत्रीत येत भाताच्या रोपाची लावणी करण्यात आली.संतप्त रहिवाशांनी रोष प्रगट केला.ग्रामपंचायत प्रशासनानेच दुर्लक्ष करीत आहे.वणी ग्रामपंचायतला प्रशासक असुन ते या बतसेच पंचायत समिती दिंडोरी बांधकाम विभागाने याची दखल घेणे अपेक्षित आहे .
