जनतेज न्युज

“- -: व्यर्थ न जाये ये बलिदान :- -“

व्यर्थ न जाये ये बलिदानअभियानांतर्गत”ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस व इंटकची क्रांती ज्योत पदयात्रा”
प्रतिनिधी , यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर “भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास”* उजागर करण्यासाठी तसेच “स्वातंत्र्य भारताच्या विकासात काँग्रेसची भूमिका” किती महत्त्वाची होती आणि आहे, हे विशद करण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर क्रांती ज्योत पदयात्रा काढण्यात आली.
क्रांती ज्योती पदयात्रा शिवाजी चौक ते बडे चौक ,इंगोले चौक , सोशालिस्ट चौक, बजाज चौक, स्वतंत्र संग्राम आंदोलनातील वर्धा जिल्ह्यातील प्रथम शहीद “जंगलुजी ढोरे” यांच्या स्मृती स्तंभ, दुर्गा टॉकीज रोड येथे मानवंदना देऊन समाप्ती झाली व त्यानंतर “हुतात्मा स्मारक”डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ९ ऑगस्ट “क्रांती दिना” निमित्त स्वातंत्र्य लढ्याच्या शहीदवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बाईट: जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चांदूरकर
इंटक पदाधिकारी:अर्चना भोमले