प्रतिनिधी , शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी संघटना व डाव्या पक्षांनी आज सोमवारी (ता.२७) सप्टेंबरला पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये विविध संघटनांनी व पक्षानी सक्रिय सहभागी होत आंदोलन केले. केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी वर्षभरापासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात जवळपास ५०० शेतकऱ्यांचे निधन झाले, परंतु केंद्रातील कुंभकर्णी सरकारला मात्र या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही भारत बंदमध्ये विविध पक्ष संघटना यांनी सहभाग घेतला होता
