प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी मध्ये वारंवार बिबट्या आढळून येत असून सध्या बिबट्या हा महिलांवर हमला करताना सुद्धा आपण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पाहू शकतो..
घटना सायंकाळी 7.45 मिनिटांची असून आरे कॉलनीतील एका महिलेवर अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्या महिलेने लाठीने त्या बिबट्याचा मुकाबला करून त्याला पाळवले.
बिबट्या घराच्या मागे लपला होता व महिला बाहेर बसली त्यानंतर बिबट्याने महिला वर हल्ला चढवला..
हल्ल्यानंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आता महिलेची तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
मागच्याच आठवड्यामध्ये चार वर्षाच्या एका लहान मुलाला सुद्धा बिबट्या कडून हल्ला झाला होता.
सध्या आरे कॉलनी मध्ये भीतीचे वातावरण आहे…
