जनतेज न्युज

गेल्या पंचवीस वर्षांमध्ये एकवीस हजार करोड रुपये फक्त खड्या वर खर्च झाले – आशिष शेलार

प्रतिनिधी , भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या पंचवीस वर्षांमध्ये एकूण एकवीस हजार करोड रुपये फक्त खड्ड्यांवर खर्च झाले असल्याचे सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या सत्तेचे सरकार आहे त्यांनी खड्ड्यांवर नेहमीच दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मुंबईची जनता सतत त्रस्त असल्याचे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी सांगितले.

तसेच येत्या काळात त्वरित उपाययोजना केली नसल्यास भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचे आणि हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित करणार असल्याचे सुद्धा आशिष शेलार यांनी सांगितले.