जनतेज न्युज

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीड तहसील बाहेर मनसेचे निदर्शने

प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीच्या मागणीसाठी बीडच्या तहसील बाहेर मनसे कडून निदर्शने करण्यात आलीय.

दरम्यान यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मंत्र्यांनी दौऱ्यावर खर्च करण्यापेक्षा हीच मदत शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून जाहीर करावी. अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात शेती बरोबरच घरांचे आणि पशुधनाची देखील हानी झाली असून त्यांना आधार देणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी पुढील आठवडाभरात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला गेलाय.