जनतेज न्युज

भाजप व शिवसेना यांच्यात चिपी विमानतळावरून श्रेय वाद सुरू असतानाच माजी खासदार व केंद्रीय कॉग्रेस महासचिव सुधीर सावंत याचा आपणच आणल्याचा दावा

सिंधुदूर्ग: बहुचर्चित चिपी विमानतळावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे व खासदार विनायक राऊत असे भाजप व शिवसेना यांच्यात श्रेय वाद सुरू आहे मात्र आता माजी खासदार व त्यावेळेचे केंद्रीय कॉग्रेस महासचिव ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी चिपी येथे आपणच विमानतळ आणलं मात्र या राजकारण्यांनी आतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा असताना तो वादामुळे सिंधुदूर्गच विमानतळ गोव्यात गेलं असा आरोप सत्ताधारी व विरोधकांवर केला

माजी केंद्रीय पर्यटन व हवाई उड्डाण मंत्री माधवराव सिदिया व एअरपोर्ट ऑथरीचे प्रमुख एअर मार्शल शाहू यांनी हवाई पहाणी व प्रत्यक्ष पहाणी करून चिपी विमानतळाची जागा एअरपोर्ट ऑर्थरिटीयांनी निच्छित केली व गोवा येथील नेव्हीच विमानतळ सिंधुदूर्गमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा झाला होता कारण सिंधुदूर्ग पर्यटन जिल्ह्या झाल्याने विमानतळ होणं गरजेचं होतं आज श्रेय वाद सुरू आहे त्यापेक्षा केवळ विमानतळाचा आतर राष्ट्रीय दर्जा टिकविला असता तर एव्हाना विमानतळ केव्हाच झालं असत आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व बे नाथ पे याच नाव द्यावं यावर वाद सुरू आहे ही शिवरायांची भूमी असल्याने सिंधुदूर्ग किल्ला जवळच असल्याने सिंधुदूर्ग विमानतळ किंवा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अस नाव असाव आपणास विमानतळ उदघाटन निमंत्रण नाही हा माजी खासदारांचा अपमान आहे असे सांगितले