जनतेज न्युज

स्मृति मंधानाचं ऐतिहासिक शतक ; स्मृतीच्या शतका नंतर सांगलीत जलोश

प्रतिनिधी , सांगली : सांगलीची सुकन्या आणि भारतीय क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज स्मृति मंधानाने ऐतिहासिक शतक झळकावले आहे. स्मृतीच्या शतका नन्तर सांगलीत जलोश करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी करून तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. पिंक बॉलवर शकत ठोकणारी पहिली महिला क्रिकेटर बनली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात स्मृति मंधानाने शतक केले आहे.
वन-डे क्रिकेट सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाज अशी स्मृतीची ओळख असून कसोटी क्रिकेट मध्ये हि तिने चांगला खेळ करत आज शतक केले आहे. स्मृतीच्या या कामगिरीमुळे सांगलीत जल्लोष सुरू असून तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.