प्रतिनिधी , मराठवाङ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे नदी काठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन गेल्या दोन दिवसापासुन पाऊसाने उसंत घेतली आहे त्यामुळे पाणी ओसरले असले तरी शेतकऱ्यांच्या जखमा उघड्या पडत आहेत . हातातोंडाशी आलेला घास उभे पिक आडवे झाले असुन अनेकांचा कडबा गंजी , पाईप , स्पींकलर , जणावरे वाहुन गेली तर घरातील आन्नधाण्यही भिजले आहे . शासन पहाणी ,पंचनाम्याच्या नावाखाली वेळ काढूपणा करत आहे त्यामुळे तत्काळा सरसगट भरपाई व विमा देण्याची मागणी होत आहे .
