जनतेज न्युज

किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही – जयंत पाटील

फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येणार हे माध्यमांनी सांगावं…

प्रतिनिधी , शिर्डी दि. १ ऑक्टोबर – किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्या आरोपांना किंमत दिली नाही.

शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी जयंत पाटील यांनी दोन्ही नेत्यांची जोरदार फिरकी घेतली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला.