प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यात सह जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जातं मात्र हवामानाचा बदलामुळे कधी करपा रोगाने शेतकरी संकटात सापडले तर सध्या तालुक्यासह जिल्हाभरात वातावरण बदलामुळे चरका रोगाने केळी उत्पादक धास्तावले आहे केळी पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या उत्पादनावर त्याच्या परिणाम होणार यामुळे केळी उत्पादक धास्तावले असल्याचे केळी उत्पादक शेतकरी भागवत महाजन यांनी सांगितले.
