प्रतिनिधी, सांगली : इस्लामपूर येथील धनराज जिद्द व चिकाटीच्या जोरावर 19व्या वर्षी बनला ऑफिसर ..इंडियन नेव्ही मध्ये कमिशनर ऑफिसर पदी निवड झाल्याने इस्लामपूर येथील धनराज पोपट कोळेकर याची पुष्प वृष्टी करत काढली मिरवणूक. धनंराज पोपट कोळेकर याची इंडियन नेव्ही मध्ये कमिशनर ऑफिसर पदी निवड झाल्याने आज इस्लामपूर येथील पोलीस स्टेशन ते माधवनगर पर्यंत पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात पुष्प वृष्टी करत मिरवणूक काढली यावेळी शिक्षक पोपट कोळेकर यांचे स्नेही मित्र परिवार पोलीस अधिकारी व अनेक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभागी झाले होते.तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या युक्तीप्रमाणे धनराजने बालवयातच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते त्याची सुरवात प्राथमिक शाळेपासून सुरु झाली प्राथमिक शाळेत असताना त्याने अनेक स्पर्धे मध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत गेला हे पाहून शिक्षक क्षेत्रात असणारे वडील पोपट कोळेकर यांनी पुढे त्याला औरंगाबाद सैनिकी पॅटर्न अकॅडमी मध्ये पाठवले.ज्या वयात मुले खेळण्यात मग्न असतात त्याच वयात जिद्द व चिकाटीच्या जोरावर धनंजय याने इंडियन नेव्ही मध्ये कमिशनर ऑफिसर पर्यत मजल मारली. यामुळे इस्लामपूर शहरासह परिसरातून धनंजय याचे कौतुक होत आहे.
