जनतेज न्युज

मोबाईल चोरणारी टोळी धुळे तालुका पोलिसांनी केली गजाआड…

प्रतिनिधी, धुळे : गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील पारोळा चौफुली ते अमळनेर चौफुली पर्यंतच्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास काही तरुणांनी मोबाईल लुटीचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु होता. यासंदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली, त्या तक्रारीची दखल घेत बारा तासाच्या आत ह्या मोबाईल चोरणारी टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सराईत मोबाईल चोर असलेली ही टोळी अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती, मात्र दाखल झालेल्या तक्रारीची तात्काळ धुळे तालुका पोलिसांनी दखल घेत संबंधित तक्रारदाराने दिलेल्या वर्णनानुसार सदर टोळीच्या शोधात तालुका पोलीस गस्त घालत असताना त्यांनी अगदी शिताफीने या सराईत मोबाईल चोरांना पकडले असतात त्यांना खाक्या दाखवत काही क्षणात त्यांच्या कडून एक लाख रुपये किमतीचे पंधरा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. तसेच त्यांनी याआधी किती मोबाइल चोरले याचा देखील पुढील तपास धुळे तालुका पोलिस करीत आहे.