प्रतिनिधी, औरंगाबाद : तंजावर जिल्यातील सेक्रेड हायस्कूलमध्ये धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडलेल्या लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री स्टालिन यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना पोलिसांनी क्रूर वागणूक देत अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधी त्रिपाठी, राष्ट्रीय मंत्री श्री मुथू रामलिंगम, दक्षिण तामिळनाडू प्रांताच्या मंत्री सुशीला आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शांती पूर्वक मार्गाने आंदोलन करत असतांना तामिळनाडू पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना अटक केली. सौदापट मजीस्ट्रेट कोर्टाने 33 कार्यकर्त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्व कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी अभाविप देवगिरी प्रांत करत आहे. लावण्या आत्महत्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय तपासाच्या निकाला विरोधात द्रमुक सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या घटनेवरून लावण्या आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. सर्वोच्च न्यायालयने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. यामुळे युवकांमध्ये लावण्याला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. लावण्याला न्याय मिळवण्यासाठी अभाविप संभाजीनगर महानगर द्वारे महात्मा फुले चौक, औरंगपुरा, संभाजीनगर येथे निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तामिळनाडू मधील द्रमुक सरकार करत असल्याचे वक्तव्य देवगिरी प्रदेशाच्या प्रदेश मंत्री सुश्री अंकिता पवार यांनी केले. तसेच संभाजीनगर महानगर मंत्री नागेश गलांडेने सांगितले कोणत्याही विद्यार्थिनीला अश्या घृणास्पद कृत्याला सामोरे जावे लागु नये यासाठी सरकारने अश्या धर्मांध शिक्षण संस्था ओळखून त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेशाच्या प्रदेशमंत्री सुश्री अंकिता पवार म्हणाल्या, “तामिळनाडू मधील द्रमुक सरकार आणि प्रशासन लावण्याच्या आत्महत्येचे प्रकरण दडपण्यासाठी सर्वोपरी मार्ग अवलंबत आहे. मिशनरीचे दुष्कर्म लपविण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करत आहे. परंतु अभाविपचे कार्यकर्ते लावण्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहतील.
