प्रतिनिधी, यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण ही संपुर्ण जगासासाठी आदर्श आहे, सर्वांनी ती आगीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.जिल्हाधिकारी अमोल येडगे शिवतीर्थवर अभिवादन करण्यासाठी सायकलीने पोहचले .या महोत्सवातून महाराजांच्या शिकवणी सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजे.शिवाजी महाराजांनी राज्यासमोर, देशासमोर नव्हे तर संपुर्ण जगासमोर आदर्श ठेवला आहे.लोककल्याणकारी राज्य कसे असावे हे महाराजांनी आपल्या जीवनातून आणि कार्यातून दिले आहे. ही शिकवण आपल्याला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी येडगे म्हणाले.
