प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या विकास कामासाठी शेकडो नागरिकाच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. मात्र वर्षानुवर्षे या बाधितांचे पुर्नवसन करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याच्या कामात 17 नागरिकाची घरे तोडण्यात आली आहेत. मात्र ६ वर्षे उलटली तरी बाधित पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहेत. या त्रस्त बाधीतानी पूनर्वसनाच्या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण छेडले आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ता रुंदीकरणासह विविध विकास कामासाठी नागरिकाच्या राहत्या घरावर हातोडा मारला जातो. विकास कामामध्ये बाधित होणार्या बाधितांना पुर्नवसनाचे आश्वासन दिले जात असले तरी प्रशासनाला मात्र पुर्नवसनाचा सोयीस्कर विसर पडतो यामुळे आपल्या हक्काच्या घरासाठी बाधितांकडून पालिका मुख्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. गरीबाचे छप्पर हिरावले गेल्यानंतर त्यांना घरभाडे देखील परवडत नसल्याने पुनर्वसणाचा प्रश्न तातडीने तडीस लावण्याची मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून या प्रशासनाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाधितांची खंत आहे. कल्याण डोंबिवली समांतर रस्त्यासाठी बैलबाजार परिसरातील २० ते २५ नागरिकाना बेघर करण्यात आले आहे मात्र २०१६ पासून वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना घर मिळालेले नसून वारंवार पालिकेत येणाऱ्या या बाधितांना हुसकावून लावले जात असल्याने आपल्या हक्काच्या घरासाठी या नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनसेच्या माजी शिक्षण समिती सदस्य उर्मिला तांबे, महेंद्र कुंडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यानी बधीताच्या बरोबर पालिका मुख्यालयासमोर उपोषण केले आहे. तर तीन दिवसात महानगरपालिकेने लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने घरे मिळणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.
