प्रतिनिधी, कल्याण : एका तीन महिन्याच्या बाळाला दत्तक दिल्याने अंबरनाथ पोलिस ठाण्यात बाळाच्या माता पित्यासह बाळ घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान बाळा दत्तक देण्याची जी प्रक्रिया होती ते कायदेशीर पणे करण्यात आली नव्हती.म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाच्या माता पित्याने हे बाळ दत्तक देतांना फक्त एक प्रतिज्ञा पत्रक तयार करुन बाळ दत्तक घेतलं होतं.पश्चिमेच्या शिवनागर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याला आपलं बाळ दत्तक दिलं होतं.काही महिन्यांपूर्वी त्यांना तिसरी मुलगी झाली होती. तिचे संगोपन करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यानं त्यांनी हे बाळ त्यांच्या ओळखीतल्या नालासोपाऱ्याच्या एका दाम्पत्याला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.मात्र कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, याची माहिती ठाणे महिला आणि बाल कल्याण विभागाला मिळताच त्यांनी बाळाला ताब्यात घेत एका आश्रमात ठेवण्यात आलं आहे.आता या प्रकरणातील दोन्ही दाम्पत्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
