जनतेज न्युज

हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.

प्रतिनिधी, जालना : कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलीय.या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्यांना कडक शासन करण्यात येऊन शांततेचा भंग करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात बजरंग दल,विश्व हिंदू परिषद,भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने देशभर संताप व्यक्त होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.