प्रतिनिधी, औरंगाबाद : आज बुधवार दोन मार्च रोजी औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील एका ऑटो पार्ट्स च्या कंपनीला मोठी आग लागली असून, सदरील घटनास्थळी अग्निशामक चे मुख्य अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामकच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी हद्दीत असलेल्या LAPL Automotive private LTD वाहनांचे इंडिकेटर तयार करणाऱ्या कंपनीला आज (दि. 2) दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पेंट शॉपला आग लागली. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात कंपनीतील मटेरियल, मशनरी जळून खाक झाले असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.कंपनीचे मॅनेजर सुनील धारपूरकर यांनी या आगीत जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. कंपनी चे मालक नीरज गोयल हे दिल्ली येथे गेले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व कंपनीतील तसेच शेजारच्या कंपनीतील कामगारांनी प्रयत्न केले. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.सदरील ठिकाणी अग्निशामक च्या जवानांकडून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
