जनतेज न्युज

रावेर येथे संविधान आर्मी शाखेचे उद्‌घाटन .

प्रतिनिधी, जळगाव : रावेर येथील उटखेडा रोड लगत पाच बीबी टेकडी येथे संविधान आर्मी शाखेचे संस्थापक अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांनी उद्घाटन केले .

यावेळी संविधान आर्मीचे प्रदेशाध्यक्ष राजेशभाई बग्गन यांनी संविधान आर्मी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान वर काम करणारी संघटना आहे . जो कोणी संविधानाची पायमल्ली करेल त्याला वठणीवर आणण्याचे काम संविधान आर्मी करते असे विचार राकेश बग्गन यांनी यावेळी मांडले .

अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांनी अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांना ईटीने केलेली अटक बेकायदेशीर आहे यासाठी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी रेल रोको आंदयोलन करण्यात येईल तसेच माजी खासदार आमदार असलेले दिवगंत नेते हरीभाऊ जावळे यांचे कोरोनाच्या काळात झालेला मृत्यू कोरोना मुळे की घातपातामुळे याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी . आदी विषयावर जगनभाई सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले . युवा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे .तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे सह असंख्य मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते .