जनतेज न्युज

अॅंड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणाऱ्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा जाहीर निषेध

ऊर्जामंत्री राऊत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे महाराष्ट्र राज्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काँग्रेस व अन्य काही सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात जाहीर सभेप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारस म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्यावर बेलगाम व बेताल वक्तव्य केले यामुळे सर्व देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहे. अशा बेधुंद वक्तव्य करणाऱ्या मंत्रांचा वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर निषेध केला आहे.

महापुरुषांच्या घरात जन्माला येणं, ही अभिमानाची गोष्ट असली तरी ती मोठी जबाबदारी असते. तो वारसा टिकवणे त्याहून मोठी जबाबदारी असते. आपल्या मर्यादा, शक्ती माहीत असताना देखील त्या नावाला, वलयाला कुठेही धक्का लागू न देता ते जपायला मोठं आत्मभान आणि विवेकीपणा लागतो आणि हाच विकिपणा खमा अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारस अ‍ॅड. बाळासाहेब अबिडकर यांच्याकडे आहे. आंबेडकर या नावाला नुसती अस्मिता नाहीये, तर करोडो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अन अशात थेट विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य असल्याने अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर या देशातील एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय नेतृत्व आहेत

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आम्हीच खरे वारसदार आहोत हे समाजाला कितीही हात कापून रक्त दाखवन्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही आणि जयभीम हा स्वाभिमान आहे, तो कोणत्याही हुजरेगिरी करणाऱ्याच्या तोंडी शोभत नाही. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांना स्वतःच्या ऊर्जा खात्यातील भोंगळ कारभार २ वर्षात नीट सांभाळता आला नाही. केंद्राच्या खाजगीकरणा विरोधात तोंडातून एक शब्द कधी काढला नाही. राज्यात अचानक मुंबईत झालेला शटडाऊन यांना माहीत नसतो, राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत यांचेच सत्ताधारी मित्र पक्ष यांना बोलू देत नाही, यांचा अपमान सर्वांसमोर होतो तेव्हा वे सर्व लाचार होवून सहन करतात. म्हणून यांची अँड. बाळासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची किंवा त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही एकप्रकारे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार झाला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.