प्रतिनिधी, कल्याण : दोन्ही अधिवेशनात तसेच मुख्यमंत्री झाल्यापासून मागील दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेले नाहीत राज्याचा कारभार मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून करणे अपेक्षित असताना ते घरी बसून राज्यकारभार करत आहेत उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीच्या जोरावर मुख्यमंत्री पद मिळवले आहे असा थेट आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. उत्तर प्रदेश सह चार राज्यात मतदारांनी भाजपला कौल देत भाजपकडे एक हाती सत्ता सोपवली आहे भाजपला मिळालेल्या या घवघवीत यशाचा कल्याण-डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी आमदार गायकवाड यांनी हा आरोप केला
