प्रतिनिधी, पुणे : कोरोनाचे लॉक डाऊन संपुष्टात आल्यानंतर सर्वत्र जीवन सर्वसामान्य बघायला मिळते . यातच आता गेल्या दोन वर्षांपासून शहरातील विविध उपक्रम पूर्ण होऊन देखील त्याचे उद्घाटन होत नव्हते . शेवटी राष्ट्रवादीला 13 मार्च चा मुहूर्त सापडला. या दिवशी शहरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभामध्ये पुणे शहरातील विविध भागातील विरंगुळा केंद्र ,हॉस्पिटल्स ऑक्सीजन पार्क उद्घाटन होणार आहे.
