जनतेज न्युज

यंदाची नाथषष्ठी होणार साजरी ; मंदिर ट्रस्ट ची पत्रकार परिषद

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगपुरा भागातील प्राचीन आसलेल्या नाथ मंदिरात गेल्या दोन वर्षापासून नाथषष्टी चा उत्साह वारकऱ्यांमध्ये असतो तो साजरा करता आला नाही त्यामुळे यावर्षी कुठेतरी शासनाने निर्बंध उठविले आहे त्यामुळे यावर्षीची नाथ षष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नाथ मंदिर प्रशासनाने ठरविले आहे दि 17 पासून ते 25 पर्यंत विविध धार्मिक कार्याचे आयोजन करण्यात आले असून दोन वर्षांनंतर पारंपरिक पद्धतीने यंदा नाथ षष्ठी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड सदानंद देवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव लक्ष्मणराव थोरात, कोषाध्यक्ष सचिन वाळके, रायभान पाटील, सतीश म्हस्के यांची उपस्थिती होती.