प्रतिनिधी, नाशिक : मराठा समाजा सोबत ओबीसी समाजाला देखील राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी एम्प्रियल डेटा लवकरात लवकर गोळा करण्यात यावा असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी नांदगावला व्यक्त केले.संभाजी राजे आज नाशिक जिल्ह्यातील नांदगावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते यावेळी राजेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून अभिषेक करण्यात आला तर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी संभाजी राजेंचीत्यांची लाडुनी तुळा केली.यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
