जनतेज न्युज

नाना पटोलेंच्या हेलिकॉप्टरने सोलापुरातील चिमुरडी हृदयाच्या उपचारासाठी मुंबईला रवाना

प्रतिनिधी, सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, काही कारणामुळे त्यांचा दौऱ्याला आज विलंब झाला,मात्र, हा त्यांचा विलंब एका चिमुरडीसाठी वरदान ठरलं आहे.नाना पटोले हे ज्या हेलिकॉप्टरने आज मुंबईला जाणार होते,त्या हेलिकॉप्टरने सोलापुरातील ‘उंजल दासी’ ही तिच्या आईसोबत मुंबईला रवाना झालीय.सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने हा सर्व योग जुळून आला आहे.उंजल हिला हृदयविकाराचा आजार असून,तिच्यावर तात्काळ उपचार करण गरजेचं होत,त्यामुळे आमदार प्रणिती शिंदेंनी विनंती केल्यानंतर नांनांनी हेलिकॉप्टर चिमुरडीला देऊन स्वतः रेल्वेने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे नेहमी स्वतःचा धडाकेबाज अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाना पटोलेंचा ही हळवी बाजू ही आता समोर आली आहे.