जनतेज न्युज

खासदार राजन विचारे यांच्याकडून जलवाहतूकीसाठी उभारण्यात येणाऱ्या जेट्टीची मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी

प्रतिनिधी, ठाणे : खासदार राजन विचारे यांनी वसई ,ठाणे ,मीरा भाईंदर भिवंडी ,कल्याण या महानगरपालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून त्याच्या कामाला नुकताच केंद्र शासनाबरोबर राज्य शासनाची ही मंजुरी मिळाली असून ज्या जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४ जेट्टीची कामे सुरू होणार आहे याचा पाहणी दौरा आज खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी पालघर जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित केला होता या पाहणी दौऱ्याला पालघर मतदार संघाचे खासदार राजेंद्र गावित ,आमदार गीता जैन, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन संजय शर्मा ,अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, पश्चिम रेल्वेचे सीनियर डिव्हिजनल इंजिनीयर प्रियेशअग्रवाल, तसेच पालघर जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रवीण पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण जंगम संदीप पाटील,बर्नाड  डिमेलो, जॉर्जी व इतर नगरसेवक पदाधिकारी व पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते