प्रतिनिधी, अमरावती : जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आतापर्यंत या देशात कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जिहादी वृत्तीचा अनुनय करण्यात आला. जम्मू-काश्मीर मधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले. याचं योग्य आणि खरं चित्रीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे स्मरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हा चित्रपट अनेक लोकांनी पाहावा याकरिता नक्कीच प्रोत्साहन देतील असा विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे
