जनतेज न्युज

संगमनेरमधे हजारो महिला कोरोना योध्यांचा सन्मान; मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री यशोमती ठाकुर यांची उपस्थिती

प्रतिनिधी, अहमदनगर : पाच राज्यात कॉग्रेसचा पराभव झाला याचे विचार मंथन कॉग्रेसला करावे लागेल.आमचे नेवृत्व कुठेच कमी पडत नाहीये कार्यकर्त्यांना पुन्हा तळागाळात जाऊन काम करावे लागेल असे प्रतिपादन कॉग्रेसचे विधीमंडळ गटनेते व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधे दिले आहे. सध्याच राजकारन हे सुडाच राजकार होत असुन ईडी सारख्या संस्थाचा वापर राजकारनात होतो आहे यामुळे वातावरन गढुळ झाले आहे.हे कुठ तरी सुधारले पाहीजे. सर्वसामान्याचे जीवनमान हे सुधारले पाहीजे. कॉग्रेस कुटुंब हे देशासाठी बलिदान देनार कुटुंब आहे.सोनिया गांधी,राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी राजीनाम द्या हे म्हनारे कोन आहेत हे तपासुन पाहन महत्वाचे आहे असे कॉग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी  सांगितले आहे.

संगमनेर मधे आज कोरोना संकटात काम करणाय्रा आरोग्यसेविका अंगणवाडीसेविका आशासेविका यांचा कौतुक सोहळा ऐकविरा फांऊडेशनकडुन संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाला हजारो आशासेविका व आरोग्यसेविका यांनी हजेरी लावली होती.यावेळी आशा सेविका व अंगनवाडी सेविका यांना ऐकविरा फाऊंडेशनकडुन भेटवस्तु देन्यात आल्या.या कार्यक्रमाला राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,आमदार सुधीर तांबे,ऐकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात,नगरअध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या.