जनतेज न्युज

भाजप कार्यकर्ता मनोज कटके हल्ला प्रकरणावर भाजप आक्रमक, पोलीस ठाण्यासमोर आधी ठिय्या नंतर उपोषण

प्रतिनिधी, कल्याण ; भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले मात्र आरोपी अद्याप अटक केली नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज भाजपा कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत उपोषण सुरू केलं. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उपोषण पोलिस ठाण्यात करण्यात येणार होते मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर  जमा होत घोषणाबाजी करत पोलीस ठाण्या बाहेरच ठिय्या देत हे उपोषण सुरू केलं.