जनतेज न्युज

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

प्रतिनिधी, कल्याण :राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. तर कल्याण डोंबिवली परिसरातही पाऱ्याने कधी नाही ती बेचाळीस पार केलीय. आज दुपार पासून रस्त्यावर अक्षरशः चटके बसत आहेत पुढचे दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काम नसेल तर दुपारी बारा ते चार या दरम्यान शक्यतो घराबाहेर न पडण्याचे प्रतिक्रिया नागरिकां कडून व्यक्त होत आहे