जनतेज न्युज

जिल्ह्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाकडे वाढता कल

प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी यांनी कांदा उत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला आहे, यामध्ये सुमारे 35 टक्के शेतकरी यांनी यावर्षी कांदा लागवड केली आहे, यात वालसावंगी वडोद तांगडा, धावडा, पिंपळगाव रेणुकाई, आधी गावचे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतात, यावर्षी तालुक्यात पाणी साठा मुबलक उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी मका, गहू, हरभरा या पिकांबरोबर कांदा पिक सुद्धा घेतले आहे व ते चांगल्याप्रकारे सुद्धा बहरून आले आहे.हे आहेत वडोद तांगडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष साळवे व संतोष जाधव यांनी आपल्या एक – एक एकर शेतामध्ये कांदा पिकाची तीन महिन्यापूर्वी लागवड केली होती त्याची योग्य निगा ठेऊन योग्य प्रकारे खत फवारणी करून निगा राखली आणि याचे फळ त्यांना मिळाले सुद्धा आहे ,कांदा हा आता काढणीला आला आहे, तो मार्केट विक्रीसाठी सज्ज सुद्धा झाला आहे पण कांद्याला सध्या बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे हे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे, सरकारने कांद्याची आयात निर्यात करावी यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळेल, व सरकारने कांद्याला योग्य भाव द्यावा जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी लागलेला खर्च निघेल.