जनतेज न्युज

साक्री तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा; प्रहार जनशक्ती पक्षाचे अर्धनग्न आंदोलन…

प्रतिनिधी, धुळे : साक्री तालुक्यातील उंबर्डे येथे ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत केलेल्या धरणांची कामे निष्कृष्ट दर्जाचे असल्याने यासंबंधी लघु सिंचन विभाग धुळे जिल्हा परिषद येथे वारंवार तक्रार करून देखील, सदर तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या कामांची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती त्या संदर्भात त्यांनी आज धुळ्यातील जेल रोड परिसरात अर्धनग्न आंदोलन केले.

साक्री तालुक्यातील उंबर्डे येथे जलयुक्त शिवार योजनेतून धरणांची कामे करण्यात आले होते. धरणांची कामे अगदी निकृष्ट दर्जाचे होते, तसेच धरणांना मोठ्या प्रमाणात गळती लागली होती या संदर्भात संदर्भात तक्रार करून देखील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच धुळे जिल्हा परिषद पंचायत, समिती साक्री येथील अधिकारी व कर्मचारी यांनी निरीक्षण दौरा अधिकाऱ्यांनी केला. त्यात संबंधित अधिकारी खोटा व मनमानी पद्धतीने तयार केला असून शासनाची दिशाभूल करण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे. असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे कैलास भदाणे यांनी केला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतात धूळ्यात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.