प्रतिनिधी, जळगाव : होळीचा सण आला म्हणजे बाजारात साखरे पासून बनवलेले हार कंगन विक्रीसाठी दुकानेच दुकान लागलेले दिसायचे मात्र होळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला तरीदेखील बाजारात साखरेचे हार कंगन विक्री करणारे दुकानाची संख्येत घट झालेली दिसत आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक देखील खरेदीसाठी येताना दिसत नाही आधी एकाच ठिकाणी आठ ते दहा दुकाने असायचे तरी ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्याप्रमाणावर असायचे व व्यापार हि चांगला व्हायचा परंतु आता दुकानांची संख्या घटून दोन दुकानं आहेत तरी व्यापार होत नाही हार कंगन तयार करायला होळीच्या पंधरा दिवसा आधी तयारी करावी लागते महागाईमुळे हार कंगनंचा बाजारावर मंदीचे सावट आले असल्याचे हार कंगन विक्रेत्यांनी सांगितले.
