जनतेज न्युज

जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील 12 ते 14 वयोगटातील मुलांना आज पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं लसीकरण सुरू करण्यात आलंय.12 ते 14 वयोगटातील मुलांना कार्बोवॅक्स ही लस दिली जाणार आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याला 30 हजार 600 लसींचे डोस प्राप्त झालेत.जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 12हजार 500 लाभार्थी असून या सर्व मुलांनी कोरोना लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.दरम्यान कोरोना पासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं संरक्षण करण्यासाठी शाळेत जाऊन लसीकरण करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.