जनतेज न्युज

महाराष्ट्रातील नाशिक येथील पोलीस चौकीत दारू पार्टी, 4 पोलीस हवालदार निलंबित – दीपक पांडे(नाशिक पोलिस आयुक्त)

प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकराच्या सुमारास 4 ते 5 पोलीस कर्मचारी ओली पार्टी करताना आढळून आले चौकीत तक्रार दाखल देण्यासाठी नागरिक गेले असता हा प्रकार उघडकीस आला आहे शिंदे नामक व्यक्ती टवाळखोर यांची तक्रार देण्यासाठी या डिके नगर पोलीस चौकी मध्ये गेले होते तेव्हा पाच ते सहा पोलीस कर्मचारी दारू पीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी लगेच आपला मोबाईल काढून या पोलिसांचं चित्रीकरण केलं संतापलेल्या पोलिसांनी शिंदे यांना मारहाण करत तिथून पळ काढला यासंदर्भात दारूची पार्टी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे