जनतेज न्युज

५३ हजार मुलांना कोर्बीव्हॅक्स लस देण्याचे नियोजन , लस नविन असली तरी न घाबरता पालकांनी मुलांना द्यावी – राहुल गुप्ता

प्रतिनिधी, उस्मानाबाद : केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे व त्यांनी मंजुर करून पाठवलेली कोर्बीव्हॉक्स लस ही कोरोणा प्रतिबंधक लस जिल्ह्यातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना देण्यात येणार असुन जिल्ह्यात या वयोगटाचे साधारण ५३ हजार लाभार्थी आहेत . सर्वांना लस देण्यासाठी  जिल्हा परिषद आरोग्य विभागाणे प्राथमिक आरोग्य केंद्रापासुन कॉम्पसह नियोजन केले आहे. लसीचे नाव नविन असले तरी केंद्र सरकारणे तपासण्या करून १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी योग्य आहे असे प्रमाणीत केलेली लस आहे त्यामुळे निसंकोच पालकांनी शेजारील वैद्यकिय अधिकारी किंवा शाळा मुख्याध्यापकांशी संपर्क साधुन आपल्या पाल्याचे लसीकरण करूण त्यांचे कोरोणापासुन संरक्षण करावे असे अवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे .