प्रतिनिधी, सातारा : 12 मार्च रोजी शाहूनगर येथे राम खारकर या वकिलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा डोळा निकामी केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे..संशयित सातारा,पुणे,सांगली येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत अजून 3 ते 4 संशयित असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत..’रस्त्यावरून बाजूला व्हा’ या कारणातून बाचाबाची होऊन ही मारहाण करण्यात आली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.. जखमी वकील हे जास्त क्रिमिनल केसेस घेत होते त्या दृष्टीने देखील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे..
