प्रतिनिधी, यवतमाळ : बनावट दारू बनविणाऱ्या देशी, विदेशी दारू कारखान्यावर अवधुतवाडी पोलिसानी धाड टाकली.शहरातील गोदनी परिसरात बनावट दारूचा कारखाना सुरू होता.अवैध रित्या स्पिरीट भरून खाली बाटल्या मध्ये दारू भरून शहरात विक्री केली जात होती.अंदाजे 5 लाखाचा मुद्देमाल दारू साठा जप्त केला असून 5 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
