प्रतिनिधी, यवतमाळ : बंजारा समाज हा डोंगर कप्पारी, तांड्यावर राहणारा समूह ओळखला जातो. आधुनिक काळात या समाजानेही नेत्रदीपक प्रगती केली आहे. मात्र, बंजारा समाजातील परंपरेचा विसर नवीन पिढीला पडू नये, हा वारसा पुढे जपला जावा, या उद्देशाने होळी सणाच्या निमित्ताने लेंगी नृत्याचे आयोजन करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त लेंगी नृत्याची धूम असून लेंगी महोत्सवात एकाहून एक नृत्य सादर होत आहे. डफाच्या तालावर समूह नृत्य केलं जातं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तांड्या तांड्यावर सध्या लेंगी नृत्य रंगत आहे. हातात हात गुंफून बंजारा समाज गाण्याच्या ठेक्यावर लेंगी नृत्य सादर करताना दिसत आहे. लेंगी हा बंजारा समाजाचा अनोखा नृत्यप्रकार आहे. लेंगी गीतातून देव-देवतांना बंजारा बांधव आवाहन करतात. या माध्यमातून वाईट गोष्टी आणि कुप्रथांवर देखील प्रहार केल्या जातो. समाजातील अंधश्रद्धा, व्यसन, बेटी बचाओ बेटी पढाओ, शिक्षणाबाबत लेंगी गीतातून जनजागृती करण्यात येत आहे. शिक्षित झालेल्या नवीन पिढीपर्यंत हा ऐतिहासिक वारसा नेण्याचा प्रयत्न समाजातील धुरीण लोक करीत आहे.
लेंगी नृत्याच्या माध्यमातून बंजारा समाजात जनजागृती केली जात आहे. नवीन पिढीला परंपरा माहीत व्हावी, हा उद्देश आहे. बंजारा समाजाची स्वतंत्र संस्कृती आहे. तांड्यात राहणारा समाज आज शहरात आला. लेंगी नृत्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात दहा कोटी बंजारा समाज आहे. विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यात होळी या सणाचाही समावेश आहे. होळीच्या निमित्ताने लेंगी स्पर्धेचे आयोजन केले जाते. सामाजिक कार्य, बेटी बचाव बेटी बचाव, व्यसनमुक्त समाज याबद्दल जनजागृती केली जाते. अनिस्ट रूढी परंपरा यावर हल्ला केला जातो. आनंदाचा सण साजरा केला जात आहे.भारतात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे. बंजारा वाणीत इतिहासाचा गाभा दडला आहे. लेंगी नृत्यातून राजे, महाराजे, संत सेवालाल महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रसार केला आहे. सामाजिक चळवळ जतन करण्याचा उद्देश आहे. ही एक प्रकारची चळवळ आहे.
